STORYMIRROR

varsha sagdeo

Others

3  

varsha sagdeo

Others

आभास

आभास

1 min
228

हरवले मी, सूरात तुझ्या बासरीच्या 

मला भास होतो तुझ्या असण्यहरवलेाचा,

मागे वळून पाहिले, तर तू नव्हताच,

कान्हा का छळतो तू असा जगतांना,


पहाटे बघुनी अंगणी सडा प्राजक्ताचा 

आठवे कृष्णाने लावलेला पारीजात, 

दिसते मज रुसुन बसलेली सत्यभामा, 

मज भास होतो, रुक्मिणी असण्याचा .


यमुनेत खेळत होता घनश्याम सावळा,

निळसर प्रवाह निशाणी सावळ्याची,

प्रयाग संगमी गोरी गंगा सावळी यमुना,

मला भासते राधाकृष्ण क्रीडा करतांना.


पानगळीच्या निष्पर्ण वृक्षवल्ली बघता,

आठवे मला पळसाची केसरीया होळी,

गोकुळी होळी खेळत राधाकृष्ण गोपी,

मला भास होतो त्या होळीत रंगण्याचा.


पानगळीचे जीर्ण-शीर्ण-पर्ण गळतांना ,

दिसे मज विरुन मातीत एकरुप होताना ,

जीवनाचा आरंभ मातीत,अंत ही मातीत,

मला भासतो हा आरंभ नवजीवसृष्टीचा .


Rate this content
Log in