गुलमोहराचे रंग
गुलमोहराचे रंग
1 min
13
उगवतीची सोनेरी किरणे
उतरली लाल चुटूक गुलमोहरी
पिऊनी गुलमोहराची लाली,
सोनेरी सकाळ केसरीया झाली
दुपारची तळपती उन्हे कलली
लाल चुटूक गुलमोहरावरी,
पिऊनी गुलमोहराची लाली,
सांज सावळी, केसरीया झाली
पुनवेच्या चंद्रासाठी झुरताना
काळवंडली सांज सावळी,
अवतरली कृष्णवर्णी रजनी,
शुभ्र तारकांचा गजरा माळुनी...
गंधाळलेला धुंद वारा पिऊन
रातराणीची कळी खुलली...
हृदयी अलवार स्वप्ने घेऊनी,
अवनी मिलनास आतुरली...
