varsha sagdeo

Romance Others


3  

varsha sagdeo

Romance Others


माझा सखा

माझा सखा

1 min 629 1 min 629


पूनवेच्या चांदण्यात मोहरले 

मंतरलेले मन तुझ्या सांगाती 


काळ्या केसात गुंफला असता 

शुभ्र धवल चांदण्याचा गजरा


पळसाच्या केसरीया रंगात रंगुन

तुला केसरीया कृष्ण केले असते


शहारले असे माझे तन मन प्राण

 सख्या तुझ्या अलवार स्पर्शाने 


रातराणीच्या गंधाने वारे पिसाटले

मयुरी केकारव भिनला नसा-नसात 


सख्या तुझ्या सांगाती मोहरले मी

मोरपिसी मनाचा पिसारा फूललाRate this content
Log in

More marathi poem from varsha sagdeo

Similar marathi poem from Romance