STORYMIRROR

varsha sagdeo

Others

4  

varsha sagdeo

Others

गुलमोहराचे रंग

गुलमोहराचे रंग

1 min
674


उगवतीची सोनेरी किरणे  

उतरली लाल चुटूक गुलमोहरी 

पिऊनी गुलमोहराची लाली,

सोनेरी सकाळ केसरीया झाली


दुपारची तळपती उन्हे कलली

लाल चुटूक गुलमोहरावरी,

पिऊनी गुलमोहराची लाली,

सांज सावळी, केसरीया झाली


पुनवेच्या चंद्रासाठी झुरताना

काळवंडली सांज सावळी, 

अवतरली कृष्णवर्णी रजनी,

शुभ्र तारकांचा गजरा माळुनी...


गंधाळलेला धुंद वारा पिऊन

रातराणीची कळी खुलली...

हृदयी अलवार स्वप्ने घेऊनी,

अवनी मिलनास आतुरली...


Rate this content
Log in