STORYMIRROR

varsha sagdeo

Others

3  

varsha sagdeo

Others

किनारा

किनारा

1 min
245

ज्याच्या ओझरत्या स्पर्शा साठी ,

लाट स्वतःचे सर्वस्व समर्पित करते ...

हो ...

तो किनारा तू च आहेस !


तिच्या हळूवार स्पर्शाने शहारणाऱा

प्रेमार्द ओलाव्याने ओलाचिंब होणारा

ह्या किनार्‍यावर जीव ओवाळून टाकणार्‍या लाटेचे ,

किनार्‍याशी विलक्षण नाते ..


लाटेच्या जीवनाचा 

अलवार विसावा सागर किनारा .....


मला सुद्धा हवा असा च किनारा 

एक हळूवार विसावा...

जीवाला जीव लावणारा ..

सहजपणे समजून घेणारा,


एक असून वेगळेपण जपणारा 

मनाच्या एका कोपऱ्यात 

अलगदपणे मावणारा....

माझ्यातल्या 'मी' ला जाणणारा 

माझे वेगळेपण जपणारा...



साहित्याला गुण द्या
लॉग इन