प्रेम माझे तूला कसे दाखवू
प्रेम माझे तूला कसे दाखवू
मला न समजे डोळ्यातले
भाव कसे समजावे तूला
ओठांवरती अडखळलेले
शब्द कसे सांगावे तुला
तूला पाहता भान हरपूनी
गालावरती खळी उमलते
ठरवलेले सारे विसरून
तूला पाहूनी नजर चोरते
सांग गड्या मी तुझी लाडकी
रंग माझा कसा चाखवू
मीरा मी तुझी सख्या
प्रेम माझे तूला कसे दाखवू

