प्रेम केव्हा होतं
प्रेम केव्हा होतं
प्रेम केव्हा होतं
आहो प्रेम केव्हाही होतं
मग ते कधी फुलावर
कधी मुलावर
कधी कुणाच्या गालावर
कधी कुणाच्या तालावर होतं
प्रेम केव्हाही होते
कधी निळ्या आभाळावर
कधी तळपत्या भाळावर
कधी सुरेल गळ्यावर
कधी हनुवटीवरल्या तिळावर
प्रेम केव्हाही होते
मनाची तार जुळली की
जुळू लागतात दोन नाती
प्रेमाच्या सागरात डुंबून
जळू लागतात दोन वाती
जळता जळता एकरुप होऊन
मनं एकमेकात गुंततात
कदाचित यालाच शब्दात
प्रेम अस म्हणतात

