"प्रेम हृदयात जाळायचे
"प्रेम हृदयात जाळायचे
मी तुला खास पटवायचे राहिले
प्रेम हृदयात जाळायचे राहिले...!!
काय सांगू तुला माजली मी पणा
बंड माझ्यात पाहायचे राहिले...!!
गुंतलो मी जरी आज प्रेमात बघ
धुंद मकरंद ही प्यायचे राहिले...!!
आंधळे प्रेम सारे मनाचे खरे
गोड विष आज भरवायचे राहिले...!!
पूर्ण करुया खुळी रेघ जी पाहिजे
प्रीत बाधेत भटकायचे राहिले...!!
दगड मातीतुनी पर्वत फोडूनही
या नदीसारखे व्हायचे राहिले...!!
चंद्र गेला कितीदा नभातून पण
पूर्ण ग्रहणास गाळायचे राहिले...!!
