Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umakant Kale

Romance

2  

Umakant Kale

Romance

प्रेम गरिबाला परवडायचं नाय !

प्रेम गरिबाला परवडायचं नाय !

1 min
7.2K

प्रेम गरिबाला परवडायचं नाय !

हाय रोग आपला नाय !

पैशाच्या या होय गोष्टी 

बा गरीबांनं फुकट मरायचं नाय !

बाबू ,जाणू म्हणतात येथे

रोज नवे नवे बकरे शोधता येथे

आता रोज मले असं वागायचं नाय

प्रेम गरीबाला परवडायचं नाय !

चेहऱ्यावर फासता ते पावडर

फाशनने कमी केलीया चादर

खिशाले भार द्यायचा नाय !

उगाच बैजार मले व्हायचं नाय !

येता-जाता बाधंता हातपाय

चेहऱ्यावरची मग उडते साय 

मले प्रेमाचं बाहुलं बनायचं नाय !

माय-बापले अंतर द्यायचं नाय !

डायरेक्ट लग्नाची वाजवेल बिगूर

सैनाई चौघडा वाजवले जरुर

उगाच खर्चात पाडायचं नाय !

हुशारी फुकट मारायची नाय !

प्रेम गरीबाला परवडायचं नाय ! 

प्रेम गरीबाला परवडायचं नाय !

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance