प्रेम छान आहे शब्द
प्रेम छान आहे शब्द
प्रेम छान आहे शब्द .. दोनच अक्षरी....
पण दुनियेला सामावून घेण्याची ताकद आहे त्यात...
आजकाल खूप लोकं भेटतात
प्रेमात पाडणारे आणि पडणारे पण,
मनापासून प्रेम करणारे कमीच असतात त्यात..
प्रेम... कोणी लहानांवर करतं,कोणी मोठ्यांवर,
कोणी प्राण्यांवर करतं,कोणी प्राणावर,
असतं सगळ्यांचच सगळ्यांवर प्रेम...
प्रेम....कोणी बोलत नाही,पण करतं,
कोणी करत,पण बोलत नाही...
असतं सगळ्यांचच सगळ्यांवर प्रेम...
कोणी पैशात करत, कोणी अश्रुंत,
माहित नसतं कुठे,कधी,केव्हा व्यक्त होईल...
असतं सगळ्यांचच सगळ्यांवर प्रेम...
कोणी फक्त नावावर करतं
पण मिळतं की नाही माहित नाही..
सांगून तरी काय उपयोग,
ज्याला प्रेम च कळत नाही....