STORYMIRROR

Gaurav Gokhale

Others

3.7  

Gaurav Gokhale

Others

मी आणि समुद्र

मी आणि समुद्र

1 min
32.1K


त्या सागराकडे बघतो मी दिवसरात्र,

झुरतो स्वत:शी काठावर बसुनी मात्र,

येताच लाट जातो हळूच सुखावूनी,

जसे सोबती यावे कुणीतरी          ।।१।।

जाताच ती लाट घेते काळजाचा घाव,

जसे सोडूनी जावे कुणी कायमचे गाव   ।।२।।

किनारी बसलेला मी आणि समोर तो अथांग सागर,

नसे दोघांमध्ये काहीच संवाद,

संवादासाठी नसे शब्द,तरी जाणतो एकमेकांमधले अंतर             ।।३।।

सागरा सागरा एवढा तू शांत का,

मनात तुझ्या विचारांचे काहूर माजले का?

तुला सांगता येत नसल्या तरी कळतात तुझ्या भावना,

नाहीतर मला.सांगता येतात भावना परि समजत नाही कोणाला                ।।४।।

तु आणि मी दोघेही सजीव, मनाने मात्र निर्जीव,

फरक आहे इतकाच मी आहे माणूस,

पण तू...ना सजीव ना निर्जीव        ।।५।।


Rate this content
Log in