चांदण्याच्या प्रकाशात
चांदण्याच्या प्रकाशात
चांदण्याच्या प्रकाशात प्रतिबिंब तुझे पडले,
क्षणात धरतीवर दोन गुलाब फुलले
मोहून गेलो त्या सौंदर्याने परी जागेपणी स्वप्न तरळले,
मनात तुझ्या अस्तित्वाचे काहूर हे माजले
स्वप्नात दिसता तो चंद्र, तुझाच भास झाला,
गालावरल्या खळीने आसमंत बहरला
चंद्राच्या साक्षीने मोहून गेलो अंतरंगात,
सूर मिसळले माझे तूझ्याच सप्तकात

