STORYMIRROR

Gaurav Gokhale

Romance

3  

Gaurav Gokhale

Romance

पाहिले तुलाच जेव्हा

पाहिले तुलाच जेव्हा

1 min
14K


पाहिले तुलाच जेव्हा मोहरलो अंतरंगात,

हळूच हसला तो चंद्र भावनांच्या हिंदोळ्यांत

पाहिले तुलाच जेव्हा पारिजात फुलला,

दरवऴला आसमंत जीव तुझ्यात भुलला.

पाहिले तुलाच जेव्हा तळमळलो का असा

भान हरपले माझे आस लागली जीवा

पाहिले तुलाच जेव्हा शब्द तोकडे पडले

काय कळेना माझेच मला नकळत सारे घडले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance