STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

प्रेम बालपणीचे

प्रेम बालपणीचे

1 min
12.3K

आयुष्याच्या संध्याकाळी, सांज किरणांच्या हिंदोळ्यावर

बसले होते दोघे जीवनाच्या, उतरत्या एका वळणावर


श्वास होते जणू तयांचे, एकमेकांत गुंतलेले 

भास बालपणीच्या प्रेमाचे, होते मनात दाटलेले


नदीकाठची भेट पहिली, नजरेतून तिच्या ओघळली

फुलता फुलता कळी होती ,एक अनामिक बावरली


भाव मनातील ओठी येण्या, वेळ कधी ना पुरायची

सांज बिचारी वाट त्या खगांची, कातर होऊन बघायची 


गुंतवून कधी हात हाती, गुजगोष्टी प्रेमाच्या केल्या

अगणित अश्या स्वप्नांतिक रात्री, प्रियेच्या गळाभेटीत गेल्या


बालपणीचे प्रेम अजूनही होते, बाहूंत त्याच्या विसावलेले

स्पंदनात गुंतून तयाच्या, सहवासाने सुखावलेले


वाट मिळाली त्या प्रेमाला, ज्याने जगणे सुंदर केले

बालपणीच्या प्रेमाने सारे, जीवन बहरून गेले 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance