STORYMIRROR

kishor zote

Romance

0  

kishor zote

Romance

प्रेम ( अष्टाक्षरी )

प्रेम ( अष्टाक्षरी )

1 min
688


मुका झाला हा संवाद

चिंता नाही ती वाटत

प्रेम आता नात्यातले

कसे चालले आटत ?॥१॥


सदा लोटे संकटात

स्वार्थ मैत्रीची संगत

प्रेम दावी भावापरी

गळा केसाने कापत ॥२॥


वाद विवाद शेजारी

चूक सदा शोधतात

प्रेम शेजार धर्माचे

धारेवर धरतात ॥३॥


तिटकारा इतरांचा

धर्म कोठे जाणतात ?

प्रेम राजकारण्याचे

लढवती आपसात ॥४॥


घेता ती जबाबदारी

स्वैर सारे वागतात

प्रेम करा स्वतःवर

क्षण कोठे थांबतात ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance