STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

3  

Sushama Gangulwar

Romance

प्रेम असे असावे

प्रेम असे असावे

1 min
399

प्रेम हे नितळ पाण्यासारखे असावे 

-हदयात डोकावून पाहिल्यावर ही स्वच्छ दिसणारे 


प्रेम हे रवीकिराणासारखे तेजोमय असावे 

लखलखणारा प्रकाश काळजाला भेदून आरपार जाणारे 


प्रेम हे आरशासारखे पारदर्शक असावे 

मन मनाशी जुळताच निस्वार्थ प्रतिबिंब दिसणारे 


प्रेम हे कमळाच्या फुलासारखे असावे 

चिखलात वाढूनही विश्वासाने फुलणारे 


प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे असावे 

काट्यांसोबत असूनही सुहासीक गंध खुलवणारे 


प्रेम हे झाडासारखे निस्वार्थ असावे 

कसलाच स्वार्थ ना बाळगता गार सावली देणारे 


प्रेम हे पावसासारखे असावे 

थेंब थेंब स्पर्शाने मिठीत सामावून घेणारे 


प्रेम हे निसर्गासारखे असावे 

समंजसपणे सतत नात्यात हिरवळ पसरवणारे 


प्रेम हे धरती व गगना सारखे असावे 

मिलनाची आस ना बाळगता नितांत प्रेम करणारे 


प्रेम असावे इंद्रधनुष्यासारखे 

जीवनात सप्तरंग भरणारे 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance