STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Inspirational

3  

DATTA VISHNU KHULE

Inspirational

प्रभुरामचंद्र

प्रभुरामचंद्र

1 min
238

हे मर्यादेच्या आगरा 

प्रभुरामचंद्र परमेश्वरा 

मयार्दा सीमेचे रक्षक 

स्वाभिमान अन सुनीतिचे दक्षक //


मर्यादेची रेषा आखुनी 

रयतेचे तुम्ही राजहित जपुनी 

मर्यादेने तुम्हा बनविले महान 

वाढविली रघुकुलाची शान //


आपुल्या जीवनी 

मर्यादा हाच गुरु 

मनात ठेवा तोचि निर्धारु 

मर्यादेची व्याख्या आपण अंगिकारू //


आपुल्या स्वअंगाला संस्काराची घालुनी मर्यादा

प्रभू रामचंद्राचा आदर्श घेऊ सदा

माणुसकीच्या भिंत रक्षणाचा वादा 

सद्गुणांचा उंचावू ध्वज //


निर्गुणाला अन वाईटाला घालुनी मर्यादा

स्वतःची एक मर्यादा आखावी

सगुणरूप मानदंडाची गोडी चाखवी

माणूसपणाला लाभलेली मर्यादेची 

आपण जनांनी आन बाण शान राखावी //


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational