STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

पोवाडा-छत्रपती शिवाजी महाराज

पोवाडा-छत्रपती शिवाजी महाराज

1 min
140

धन्य,धन्य युगपुरुषाला 

शिवाजी राजांना,क्रांती सूर्याला 

वंदूनी त्यांच्या शुभ चरणाला 

महान संघर्ष योद्ध्याला जी जी जी 


29फेब्रुवारी 1630सालाला 

भोसले घराण्याला 

मोठेपण शिवनेरी किल्ल्याला 

भाग्य लाभले महाराष्ट्राला जी जी जी 


वीरपुत्र जिजामातेला 

पिता शहाजी राजाला 

आनंद झाला मातृपितृ नात्याला 

वंशाचा दिवा आला जन्माला जी जी जी 


दोदोजी कोंडदेव मार्गदर्शनाला 

लढाईचे शिक्षण शिवाजी राजाला 

सह्याद्रीचा कडा बोलू लागला 

खेळायला मावळे संगतीला जी जी जी 


महाराष्ट्र त्रस्त झाला 

विजापुरच्या आदिलशाहीला 

अहमदनगरच्या निजामशाहीला 

भयानक मुघलशाहीला जी जी जी 


मुघलशाहीचा बिमोड करण्याला 

महाराजांनी विडा उचलला 

हुशार मावळे घेतले संगतीला 

बाजीप्रभू,तानाजी,विश्वासू सरदार जोडीला जी जी जी 


मुघलांचा सुळसुळाट झाला 

पिकांची नासाडी करू लागला 

अमानुष,अत्याचार वाढला 

माता,भगिनीवर सूड उगवला जी जी जी 


महाराजांचा राग अनावर झाला 

16व्या वर्षी सुरुवात लढाईला 

किल्ल्यामागून किल्ले जिंकण्याला 

संपविले मुघलशाहीला जी जी जी 


अफजल खानाचा वध केला 

पळ्वून लावले शाहिस्तेखानाला

सिद्धी जौहर,मिर्झा जयसिंगाला 

धडा कायमचा शिकविला जी जी जी  


तोरणा किल्ला,प्रतापगड,रायगडाला 

सिंधुदुर्ग,जलदुर्ग बांधण्याला 

किल्ल्यांचे संरक्षण महाराष्ट्राला 

अभिमान ऐतिहासिक वास्तूला जी जी जी 


1674 सालाला राज्याभिषेक झाला 

सर्वधर्म न्यायप्रिय राजा मिळाला 

बहुजनांचा राजा महाराष्ट्राला 

हिंदवी स्वराज्य स्थापनेला जी जी जी 


3 एप्रिल 1680 सालाला

महाराजांचा मृत्यू झाला 

गरीबांचा कैवारी हरपला 

दुर्जनांचा सहांरक गेला जी जी जी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract