Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

1.0  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

पोवाडा भारत देशाचा

पोवाडा भारत देशाचा

1 min
14.5K


शत-शत प्रणाम देशाला।

भारत भूमीला।पावन भूमीला।

साधू, संतांच्या कार्याला ।

देश होता पारतंत्र्यात।

गोरे साहेबांच्या गुलामीत।

गुलाम म्हणून जगण्यात। जी जी जी


भारतीयांचे रक्त सळसळले।

मनामनात असंतोष पेटले ।

जीवावर सर्व उदार झाले ।

अंधारमय युगात ।

अवघ्या भारत देशात।

इंग्रज हटाव मोहीम जोरात। जी जी जी


टिळक, महात्मा गांधींचे योगदान।

पेटविले इंग्रजांविरुद्ध रान ।

निघा आता भारत देशातून।

क्रांतिकारक वीर महान।

भारत मातेसाठी दिले झोकून

इंग्रजांना जर्जर करुन। जी जी जी


इंग्रज उठले चवताळून

क्रांतीकारकांवर अत्याचार करुन

अमानुष मारले इंग्रजांन ।

देशासाठी शहीद होऊन ।

त्यांच्या रक्तातून प्रेरणा घेऊन

सर्व भारतीय एक होऊन

दिले स्वातंत्र्य मिळवून । जी जी जी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational