STORYMIRROR

Eshawar Mate

Tragedy Inspirational

2  

Eshawar Mate

Tragedy Inspirational

पोर

पोर

1 min
14.6K


पोर वयाने लहान, नाही पायात वहान ।

तिला लागली तहान,तरी ओठावर गान।

ऊन्हाच्या पहाऱ्याशी, अन वाढत्या पाऱ्याशी

केस खेळती वाऱ्याशी, नजर राम बाण ।।

बाप गेला मजूरीले, माय शेतात कामाले

लेक चालली पाण्याले, आहे मोठी गुणवान।।

तिच्या पापण्यात पाणी, पाय जळे अनवानी

पाण्यासाठी रानीवनी, फिरे भारताची शान।।

ती जिजाऊंची लेक, सावित्री वानी नेक

जीने लाचारीचे फेक, शिकव स्वाभिमान।।

इवल्या जीवावर, साऱ्या जमाण्याचा घोर

ती माय उद्याची थोर, करा लेकीचा सन्मान।।

खरं-खरं मी बोलतो, ताले मेंदूचे खोलतो

शब्दा-शब्दाला तोलतो, मला माणूसकीचे भान।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy