STORYMIRROR

Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

पंख..!

पंख..!

1 min
159

पंख फुटण्या आधीच

छाटण्या ची तयारी होते

पालवी दिसता क्षणीच

त्यास नख लागतें

नियती अशी का

कधी कधी क्रूर होते

जीवन फुलण्या आधीच

ते लयास जाते

नजर लागते कशी

ते आता मला कळते

जेंव्हा जेंव्हा ते

फुलण्या आधीच कोमेजते

सवय झाले मला आता

या नकार घंटेची

काम करते कधी कधी

डोकेदुखी वरी गोळी सुंठेची

शेवटास कोष फोडूनी

आशेचे पाखरू झेप घेते

तेंव्हा कोठे दैवासहीं

कर्मा पुढे झुकणे भाग पडते

कर्माची प्रभाच मोठ्ठी

दैवासहीं झुकवते क्षणात

ताकद असते अचाट

कर्माच्या कणा कणात

दैव बलवत्तर असता

कर्म हि होते सुखमय

कर्मास साथ दैवाची लाभता

यश येते जीवनी घेऊनि भाग्योदय.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action