STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

4  

Priyanka Shinde Jagtap

Inspirational

पंख छाटू नका

पंख छाटू नका

1 min
544

प्राॅम्प्ट १५


१५/०५/२०१९


विषय - बालकामगार मुक्ती

कवितेचे शीर्षक - पंख छाटू नका


 फुलपाखरांचे पंख कोवळे

 निष्ठुरतेने असे छाटू नका,

 बालपणातली निरागसता

 हिसकावून अशी घेऊ नका ॥१॥


 मुक्तपणे बागडू, उडू-बिडू दे

 निळाईने पांघरलेल्या गगनात,

 निसटत्या क्षणांचा आस्वाद 

 चाखू द्या की कणभर सुखात ॥२॥


 बालकामगारांचे हे गार्‍हाणे 

 कष्टांचे ओझे पेलण्या तत्पर,

 पाटी-पेन्सिलची साथ नाही 

 कोलमडलेल्या अवस्थेत घर ॥३॥


 राबतयं कुणी टपरीत चहाच्या 

 कुणी फटक्यांच्या कारखान्यात, 

 विटभट्टीवर कुणी पोळत आहे

 तर कुणी किराणाच्या दुकानात ॥४॥


 पिळवणूक ही थांबवावी लागेल

 शिक्षणाच्या माध्यमातून तारावे,

 मुक्तता हवी गंभीर आजारांतून

 पुनर्विकासाचे आमंत्रण धाडावे ॥५॥


 निरक्षर, व्यसनाधीन पालकांनो

 पोटच्या मुलांना यंत्र समजू नका,

 निर्दयी, कठीण पाषाणासारखे

 जागेपणी मरणयातना देऊ नका ॥६॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational