पंढरीची वारी
पंढरीची वारी
पंढरीच्या विठुराया
तुजला साद घालती
पालखी सोहळा कधी
भक्त सारे विचारती ||१||
तुळस घेतली शिरी
हाती असे जपमाळ
भेदभाव नसे येथे
उजळुणी दिपमाळ ||२||
रिंगणाच्या आनंदाचा
कसे वर्णवु शब्दात
धावा असे विठ्ठलाचा
भक्तिभावे आनंदात ||३||
संतांच्या या महतीने
येई नित्य भक्तीपूर
विठुरायाच्या दर्शना
सारे होती हो आतूर ||४||
धन्य असा तू विठ्ठला
होती भक्तांचे दर्शन
तुझ्या वारीने घडते
विठुरायाचे दर्शन ||५||
