पक्षी
पक्षी
परमेश्वरा मला
कर आता पक्षी
पंखावरती दे
सुंदर सुंदर नक्षी
कोकिळेचा दे गळा
रंग दे मोराचा निळा
नजर दे घारीची
झेप दे गरुडाची
वृत्ती दे सुगरणीची
मेहनत करण्याची
फिरू दे मज
मुक्त आकाश
नकोसा झाला
हा बंदिवास
