STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

पितृमहिमा

पितृमहिमा

1 min
254

दिसत असतात कणखर वरून 

हळवे असते पित्याचे मन 


परिस्थितीला सामोरे जातात ते न भिता 

अश्रूंनाही बांध घालतो तो एक पिता 


दुःखात भिजवितो फक्त डोळयांच्या कडा 

सत्य परिस्थिती बघता त्याचा जीव होतो वेडा 


पित्याची भूमिका खरेच खूप आहे अवघड 

मन मोकळे करतायेत नाही त्याला धड 


जीवनसंघर्ष करता करता संपून जातो सुखाचा काळ 

सुखाची प्रार्थना देवाजवळ करतो आयुष्यमान होऊ दे माझा बाळ 


एकच सांगणे करा आदर पित्याचा, धरा

त्याचे पाय खरे तर आई आहे मायेचा झरा

गवसतो जीवनाचा आनंद पित्यामधे खरा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational