पीएचडी
पीएचडी
पीएचडी देखील विकणारे
पाहिले जेव्हा गुरु
म्हणाले हतबल विद्यापीठ
आता काय करू
----------------------------------
नोटा मोजा पदवी घ्या
रोखीत छान धंदा आहे
कधीच नाही मंदी
नफा रुपाया बंदा आहे
-------------------------------
जे कधी घडू नये
तेच नेमके घडते
पैशांशिवाय विद्यापीठातही
पावलोपावली अडते !
------------------------------
नितीमुल्ये विकण्यासाठी
गुरू भलतेच अधीर होतात
दिवसाआड एकेकाचे
कारनामे छान छापून येतात
