STORYMIRROR

Poonam Shinde

Tragedy Fantasy

3  

Poonam Shinde

Tragedy Fantasy

फूलं, सूमम नाव तव देहांचे

फूलं, सूमम नाव तव देहांचे

1 min
151

सुगंध लूटतात एक दिवसाचा

आनंद कमवतात लाखो मनाचा 

फूलं, सूमम नाव तव देहांचे 

करी न शिकवे मन देवाचे...


पायाशी तूडविले, डोक्याशी लाविले

तरी देई सुगंध सारखेच

फुल, सुमन जाव तव देहांचे

कमी न कोणा लेखिले...


होईल, धन्य तुझी ही काया

तुज देवास जर वाहीले 

फूल, सुमन नाव तव देहांचे

सुगंध चोहीकडे दरवळे...


करूनी सेवा एक दिवसाची 

नाव तूझे हे युगायुगांतरी 

फुलं, सुमन नाव तव देहांचे 

तूझी किमया न कोणा कळे....


लेवूनी रंग अंगावरती

भोवरा गाई सुरेख गाणी 

फूल, समन नाव तव देहांचे

देह अर्पिले तू सर्वांन ठायी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy