संघर्ष
संघर्ष
1 min
162
ही जीवनाची वाट माय
किती अवघड हाय ग
जिथं जाव तिथं संघर्ष
पुढं उभाचं ठाय ग
ओघवतात अश्रूही...
पण पुसायला हातचं न्हाय ग
हिन म्हणून दुखावतात
ते मोठे लोक ग
दुःख असले नशिबी
तरी त्याचे ओझे न्हाय ग
माणूसपण संपलय या जगातलं
मनी ही खंतच रहाय ग
संघर्षाविना यश नाय
कुणा कळतच न्हाय ग
आयुष्य जाई रडत रडत
संघर्ष दिशाहीन होई ग
जातात लोकं तेच पुढं
जे स्वतःशीच लढतात ग
संघर्षाची वाट माय
खरचं अवघड हाय ग