डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर


रत्न पुरस्कारीता तू आंबेडकरा
उभा दलितांच्या रक्षणाला तू पुण्य स्मरणा
पुजती लोकं सारे तुज भारतरत्ना
संविधान अर्पून देशा केली पूर्ण कामना
चळवळी उभारील्या जनतेच्या रक्षणा
हक्क दिलेस तू स्त्रीच्या स्वाभिमाना
बौद्धांच्या हितासाठी केले उभे आरक्षणा
स्विकारुनी धर्म बौद्ध जिंकले मना मना
शिल्पकार बोलती तुम्हां दिली ज्ञानवंदना
आदर आम्हा वाटे आपुला पदवीधर दयाधना
सोसले अपुल्या देही अस्पृश्यतेच्या वेदना
लढले अवघ्या जगाशी तो अधिकाराचा सामना
वंदावे असे वाटे मना तुमच्या या चरणा
दिलेस आम्हा ज्ञान तू चितहरणा...