आला दुष्काळ, दुष्काळ
आला दुष्काळ, दुष्काळ
आला दुष्काळ, दुष्काळ
घेउनी शेतकर्याचा काळ
माती कोरडी पडली
डोळा अश्रूंची हो धार
वाट पाहूनी पाहुनी
धीर गेला हो सोडूनी
पोट भरू लेकरांची
स्वतः उपाशी राहूनी
आला सन औंदा दारी
घरा नाही दाणा पानी
आठवूनी दिस ते
होती हिरवळ रानो-रानी
किती कष्टानं कष्टानं
शेत नांगरल हे
पैसा ओतला घामाचा
आता धाऊनी तु ये
किती अंत हा पहाशी
जीव माझा तू हो नेशी
स्वप्न लेकरांची माझ्या
अशी खूंटीला टांगशी
सावकाराच्या कर्जा पायी
जीव होई कासावीस
रोज-रोज मरन्यापरी
घेतो फास मी गळ्यास
