मनाने शोधीला आधार मनाचा
मनाने शोधीला आधार मनाचा
मनाने शोधीला आधार मनाचा
दु:ख ना कळावे कोणासी
कोणी नाही या जगी आपूले मग का ?
कोणासाठी तू झूरसी
जन्म घेऊनी एकटेची
एकटेची जावे स्वर्गी
हे दिसे सारे दुनियेला
पण कळले नाही कोणासी
पाप-पुण्य हा खेळ जनाचा
मनाला करवूनि व्याधी
हरलास-की तू जिंकलास
हे मेल्यानंतर देव विचारती आधी
माणुस म्हणूनी पृथ्वीतलावरती
जन्माला यावे एकदाची
किर्ती करुनी अजन्माची
पण चित्ती रहावे सर्वांची
चित्तं शांत करावयास
वित्त नाही लागती
समाधानाने मिळती सर्वकाही
पण समाधान नाही विकत मिळती
मनाच्या या अंत: करणात
जाऊनी बघसी तू एकदाची
सारे देव तेथेची भेटती
मग वाटेल तुज का गेलो मी देवळासी
