अंगाई
अंगाई
आवडीने लिहिते मी अंगाई
वही आणि पेन सोबतीला शाई
उशाशी घेऊन झोपते रोज
आठवली ओळ कि लिहीते थोर
मनाला ही असते चिंतनाची घाई
चांगले चांगले विचार कसे सुचतात बाई
शब्दांच्या जुळन्यान कशा कळतात भावना
खरय का ? फक्त दुःखातच असतात वेदना
कोणाला असते उद्याची घाई
छान छान स्वप्न कशी पडतात बाई
विचार करता करता मन जाई निद्रनाला
थकले तारे देहाचे आता घ्यावे मिटून नयनाला
