कन्या माझे रत्न...
कन्या माझे रत्न...
तूझ्या इवल्याशा पावलांनी
सजल माझं घर...
पिल्लू मीच तूझी आई
अन् बाबा तूझे थोर
कन्या मिळालं रत्न मला तू
शिवजयंतीचा जन्म...
तूच माझा सुर्य जणू तूच माझा चंद्र
पायांमध्ये सजू दे
घुंगुराचा छंद
तूझ्या सोबत खेळताना
मन होई माझे धुंद
गालावरच हसू तुझ्या
मनी पाडी मोह
मिठीत तुला घेण्यासाठी
हा जीव माझा झुर....
उदंड मिळो आयुष्य तुला
होवो किर्ती सागरासमंत
लाखात शोभून दिसे मला
तू कन्या माझे रत्न...
