एक मुलगीचं
एक मुलगीचं
एक मुलगीचं...
पण व्यथा तीची वेगळीच
चारी बाजूंनी वाईट समाजाने घेरल
म्हणून आई-वडीलांनी जन्म देनच सोडलं
भ्रूणहत्या म्हणून...
कधी घरच्यांनीच घेतलं प्राण
जन्माला आली तरी...
वंशाला दिवा नाही म्हणून अपमान
कोणासाठी ती, असे लाडकी बाहुली
तर कोणासाठी ती, सर्कशीतली खेळणी
आयुष्य तीचं होई, उजडलेलं रानं
जेव्हा घेऊन जाई कोणी तीचे,
जिवंतपणीच प्राण
असतात हो तिच्या अपेक्षा ही फार पण
समाजापुढे झुकविते तीही आपली मान
एकटी घराबाहेर पडण्याचं
कधी स्वातंत्र्य नाही तिला पण
घरातलं ही संरक्षण कोणी देईल का हो तिला?
लहान वयात लग्न करूनी...
मांडावा लागे संसार शिकुन तरी तू काय करणार?
असा जग करी संहार
