STORYMIRROR

गीता केदारे

Inspirational

3  

गीता केदारे

Inspirational

... फुटबॉलर...

... फुटबॉलर...

1 min
272


फुटबॉलर बनण्याचे

 बाळगले होते स्वप्न उराशी... 

 नशीबाने केला घात

 खेळ खेळला माझ्या स्वप्नांशी... 

 

लहानपणीच पडली जबाबदारी 

कुटुंब सांभाळण्याची 

संसार रहाटगाडगं ओढताना 

छंदांना काडी लावण्याची... 


आता वाटतंय जगावं पुन्हा 

आयुष्य आपलं नव्याने 

ज्या आवडीचा केला होता बीमोड 

त्या आवडींना जपावे नव्याने... 


ऑफिस सुटल्यावर आता 

फुटबॉल मी खेळतो 

आयुष्याचे मी आता 

नव्यानेच स्वागत करतो..... 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational