STORYMIRROR

Shila Ambhure

Fantasy

4  

Shila Ambhure

Fantasy

फुलराणी मी फुलराणी

फुलराणी मी फुलराणी

1 min
338

फुलराणी मी फुलराणी

गाते बहराची गाणी।।धृ।।


झाडेवेली,पक्षी-पाखरे

सवंगडी हे रानातले

वसंतऋतु सखा माझा

ओळखतो मनातले

श्रावणसरी सुखाविती हसते मी मनोमनी।।1।।


अत्तराचा सुगंध माझा

इंद्रधनुचा रंग छान

वाऱ्यासंगे खेळ खेळते

हळूच डोलाविते मान

ध्यान देऊनि ऐका जरा गुपित सांगते कानी।।2।।

शामवर्णी मिलिंद कसा

घालितो सारखा दंगा

देऊ करितो नजराणा

मजपाशी त्याचा पिंगा

आर्जव त्याचे मोडू कसे मंजूळ तयाची वाणी।।3।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy