फुले तुझ्या गावी
फुले तुझ्या गावी
तुझी माझी प्रीत अंतरातुन बहरावी
नसताना आपण गीते लोकांनी गावी
कंठ व्हावा तूच श्वास मी तुझा
प्रित आपली नसताना स्मरावी
जोगवा प्रेमाचा वाटून हृदयात
गावकुसाबाहेर वस्ती तुझ्या गावी
पोळलेत प्राण, दाह नको झाला
चेतुन चिता तरी थंड या गावी
हा जल्म तुझ्यासाठी पुष्प मी झाले
सरनावर रक्त माझ्या अन् फुले तुझ्या गावी
