फक्त तू
फक्त तू
हृदयातील स्पंदनाची ओढ तू,
श्वासातील हुंकाराचा ध्यास तू,
मनातील चांदण्यांचा भास तू ,
अन कोंदन तू स्वाप्नाच्या जवाहिऱ्याच
असुसलेल्या भेटीची आस तू,
गुंतलेल्या जिवाची नाळ तू,
स्वप्न पल्लवीची पहीली पहाट तू,
अन सर्वस्व तू अथांग अफाट आचाट प्रेमाच
वाळवंटातील लोभस मृगजळ तू,
पाण्याच्या नितळ खोल थांग तू,
आठवांचा भावना कल्लोळ तू,
अन पैजन तू आयुष्याच्या मंजुळ गाण्याच
माझ्यात विरता एकरूप तू,
दोन जीव एक श्वास तू,
ऋणानुबंधाची निसटती गाठ तू,
अन एक नात तू गुर्फलेल आजीवनच
झुरण्याच जगण्याच कारण तू,
प्रत्येकीत दिसावी अशी फक्त तू,
हृदयातील आजही एक भाग तू,
अन तू निखळ पहिल प्रेम माझ्या आठवणीच

