STORYMIRROR

Rohan Dhage (RB)

Inspirational

3  

Rohan Dhage (RB)

Inspirational

फक्त तुझंच नाव का?

फक्त तुझंच नाव का?

1 min
264

गर्भवती मी राहिले

कितीतरी सोशिल्या मी कळा,

संपूर्ण जमीन माझीच

मग सांग ना तुझा कसा मळा...

वावरात बियाणं घालून

तू बिनधास्त झालास

दिवसरात्र मशागत मी केली

भाव तू कसा देणार मालास...

पीक लहान होतं त्याला

गुरा ढोरापासून वाचविलं,

धान सुकून जावू नये म्हणून

पाणी छातीचं पाजविलं...

तुला नाही चिंता

शेताची ना धानाची,

तू रांगडा पुरुष

भूक तुला यौवनाची...

पीक काढणीच्या येळंस

नांगर घुसला माझ्या छातीत,

टरटर फाडीत गेला

तेव्हा सोनं तुझ्या मुठीत...


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Inspirational