फक्त तुझी साथ हवी
फक्त तुझी साथ हवी
काय तुझे ? काय माझे ?
ओढाताण ती नसावी
तुच माझी मीही तुझा
साद प्रतिसादा हवी
श्वास माझा गंध तुझा
देव घेव अशी व्हावी
हास्य तुझे ओठ माझे
खळी गाली ती फुलावी
घर पण ते घराचे
छबी तुझीच दिसावी
प्रसन्नता पहाटेची
सुगंधात ती नहावी
विश्वासाला विश्वासाची
जाण आपली असावी
वाट पाहताना मग
शंका कुशंका नसावी
दोन पावले सुखाचे
अशी सदा पडावी
सुर पैंजण मंजुळ
कानी हळूच गुंजावी
लढा देऊ संकटांना
भीती का बरं वाटावी ?
माझे सर्वस्व तुच ग
फक्त तुझी साथ हवी

