फितूर
फितूर
समजावले स्वतःला
का जायचे त्या वाटेला
ओळखीचे चेहरे लागले
आता परके दिसायला||१||
वाटते जगणे अशक्य
आपल्या फितूर लोकांत
कसे रहावे जगताना
बाह्य विचारांच्या धाकात||२||
कशी रोखावी फितूरी
आपलेच दात ओठ
जिव्हाळ्याच्या नात्यात
कशाला हवी फूट||३||
भावनांचा खेळ सारा
हुंदके रोखावे किती
दुभंगलेल्या मनाला
ठिगळ जोडावे किती||४||
फितूरीचे वादळ आता
थोपवू वेशीबाहेर
शाब्दिक प्रेमाचा
देऊनीया कडक आहेर||५||