पहिल्यांदा पाहिले होते
पहिल्यांदा पाहिले होते
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
ते दिवस मला अजूनही आठवते
तुला मी पहिल्यांदा पाहिले होते
तुला पाहताच मी स्वतःला हरवले होते
त्याचे भानही मला राहिले नव्हते
दोन क्षणात तुझ्यावर मी स्वतःला वाहिले
जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले
पहाटेच्या दवासारखी शितल स्पर्श करणारी
मागच्या सारखी तनामनात सुगंध पसरवणारी
सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखी चैतन्य देणारी
झाडासारखी उन्हात राहून सावली देणारी
समोरच्याला पहाडासारखी गगनाला भिडणारी
विचारात समुद्रासारखी तळाचा थांग न लागणारी
स्वतःच्या असल्यानं मन पवित्र करणारी
हिऱ्याप्रमाणे शांत नाजूक व लखलखणारी
कदाचित तुला पाहून पहिलं प्रेम झाले होते
जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले होते
तरीदेखील तुझी साथ सोडणार नव्हते
हाच एक विश्वास नेहमी मला वाटत होते