मिठीतला गारवा
मिठीतला गारवा
गारवा तुझ्या मिठीत
धुंद जाणवे मला
म्हणूनच हा मोगरा
खुणावतो सदा मला
स्थिर मंद चांदणे
आल्हाद देई मनाला
बसुरीचा सुर असे
मधुर नाद येई मना
सखे थांब ना थोडी
अजुनी उजाडे ही पहाट
थांब जरा मजजवळी
ओसंडू दे ह्या माझ्या मनाला
आज सखे हे मन
तुझ्या मिठीत सुखावल
बुडू दे त्याला अखंड
स्वर्ग सुख दे मजला बहुत

