कोणीतरी झुरत जगतंय
कोणीतरी झुरत जगतंय
तुझ्यासाठी वेड्या मना
कोणीतरी वाट बघतंय
तू भेटशील या आशेत
कोणीतरी झुरत जगतंय ||0||
तुझ्यासाठी तिने जगी
जन्म नक्की घेतलाय
भाव वेडा प्रीतीचा
हृदयी का चेतलाय
स्मित भाव मनी लेवून
कोणीतरी स्मित हसतंय
तू भेटशील या आशेत
कोणीतरी झुरत जगतंय ||1||
कधी भेट होईल तिची
काही सांगू कसे
जितका करू विचार मी
हृदय तितकं फसे
हृदयी माझ्या हळुवारपणे
कोणीतरी हळूच वसतंय
तू भेटशील या आशेत
कोणीतरी झुरत जगतंय ||2||
हृदयाच्या गाभाऱ्यात
प्रेमाच्या इशाऱ्यात
प्रेमरूपी अवखळ
तीच या वाऱ्यात
चौकटीत हृदयाच्या
कोणीतरी फिट बसतंय
तू भेटशील या आशेत
कोणीतरी झुरत जगतंय ||3||