ढोलली
ढोलली
ढोलकी ची थाप,
दरबारी नाच.
पायात घुंगरु,
तमाशात नाच....
रसिकांचा वाद ,
घुंगरांचा नाद.
म्हणती यालाच,
लावणीला दाद....
बाजार इश्कांचा ,
भरला घरात .
बहुरंगी विडा
रंगला तोडांत.....
जांभळया शालुला ,
झालर चौरंगी.
फळावर उभी,
नारी नटरंगी......
रात्रीस चढते,
मदनाची नशा,.
कित्येक मोगरा,
बहरलेल्या अशा....
साथ ढोलकीची,
होऊन बेभान.
आज ही नाचते,
ही कलाकारीन......

