STORYMIRROR

Yogesh Patil

Romance

3  

Yogesh Patil

Romance

" व्यसन झालय मला... "

" व्यसन झालय मला... "

1 min
12.1K

व्यसन झालय मला ,

शब्दांना शब्दांशी जोडण्याचं ,,

पाषाणी हृदयावर ,

भावनांच्या शाईने रेषा ओढण्याचं...


व्यसन झालय मला ,

काट्यांतून गुलाब वेचण्याचं ,,

माझ्या मनाच्या वाळवंटात ,

तुझ्या हरविलेल्या पाऊलखुणा शोधण्याचं...


व्यसन झालय मला ,

वाक्यांना चालीत गुंफण्याचं,,

माझ्या हृदयाच्या कान्याकोपऱ्यात,

तुझ्या प्रेमाचा सडा शिंपण्याचं...


व्यसन झालय मला ,

फक्त तुझ्यात गुंतण्याचं ,,

तू नसताना सुद्धा ,

माझ्या प्रत्येक क्षणांत ,

तुझ्या आठवणींनी प्राण फुंकण्याचं...


व्यसन झालय मला ,

फक्त कविता नाही ,

 तर तुझी सावली आकारण्याचं ,,

तू पाहिलेल्या त्या प्रत्येक स्वप्नाला ,

सत्यात साकारण्याचं...


व्यसन झालय मला ,

वास्तव नाकरण्याचं ,,

तू अजूनही ,

माझ्याच सोबत आहे,

 हेच सत्य स्विकारण्याचं...


व्यसन झालय मला ,

बेधुंद होऊन लिहीत राहण्याचं ,,

माझ्या प्रत्येक कवितेत,

तुझे प्रतिबिंब पाहण्याचं....


व्यसन झालय मला ,

तुझ्याच ओघात वाहण्याचं ,,

दोन घटका का होईना ,

तुझ्याच सहवासात राहण्याचं.....

दोन घटका का होईना ,

तुझ्याच सहवासात राहण्याचं.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance