STORYMIRROR

Yogesh Patil

Romance

3  

Yogesh Patil

Romance

" क्षण..."

" क्षण..."

1 min
11.4K

असतात क्षण असेही

 ज्यांना आठवावेच लागत नाही

असतात क्षण असेही

ज्यांना विसरावेच लागत नाही


असतात क्षण असेही

जे आठवून हसायलाच येत नाही

असतात क्षण असेही

जे आठवून हसणच थांबत नाही


असतात क्षण असेही

ज्यांना आठवावेसेही वाटत नाही

असतात क्षण असेही

ज्यांना आठवून अश्रूंचा आवरत नाही


असतात क्षण असेही

जे आठवायलाच येत नाही

असतात क्षण असेही

जे कधीही विसरलोच जात नाही


असतात क्षण असेही

ज्यांच्यात हे संपूर्ण आयुष्यच मावत नाही

असतात क्षण असेही

ज्यांना विसरले तर आयुष्यात काही उरतच नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance