Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogesh Patil

Romance

3  

Yogesh Patil

Romance

सावली

सावली

1 min
11.9K


काय ही वेळ , 

किती दाटूनी आला काळ ,,

निसटली भूई माझी , 

अहो कोसळले आभाळ ,,

पोरका झालो मी ,

झालं जगण ढगाळ ,,

कारण आता माझ्या सावली ची,

नाही होणार सकाळ...


मावळताना तिने ,

मला घातलं गाऱ्हाणं ,,

माझ्यासाठी तू ,

गाशील का शेवटचं गाणं ??

शब्दच हरविले माझे ,

नाही ठाई राहिले भान ,,

चाली नेच सोडली साथ ,

आता कसा गाऊ मी गुणगान...


अंग शहारून जाते ,

आज तो प्रत्येक क्षण आठवितांना ,,

किती बावरी व्हायची तू , 

मी तुझ्यावर रुसतांना ,,

अश्रूंचा फुटतो पाझर ,

त्या आठवनिंना साठवितांना ,,

प्रत्येक वेळी तूच शरण जायची , 

जरी चुकी माझी असतांना...


काल वेळ होती ,

तर प्रेमच कळाले नाही ,,

आज प्रेम करायला शिकलोय ,

तर वेळेची अनुमतीच नाही ,,

वेळेला माझी विनती ,

नको करो घाई ,,

कारण , 

आज आम्ही आलोय एकत्र ,

पण आम्हाला उद्याची सवलतच नाही...


किती अभागा आहे मी ,

मज जाण ना झाली खऱ्या प्रेमाची ,,

दोषी आहे तुझा ,

कदर ना केली तुझ्या भावनांची ,,

हृदयात तू असताना ,

मला गरज काय कुणाची ?

होतो ,

आहे , 

आणि 

राहील फक्त तुझाच ,,

शपथ घेऊनी सांगतो ,

मी तुझ्या प्रेमाची.....

शपथ घेऊनी सांगतो ,

मी तुझ्या प्रेमाची.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance