अजूनही आस आहे
अजूनही आस आहे
अजूनही आस आहे
तू माझी खास आहे
बघून तू माझ्याकडे
गुलाबासारखी लाजशील
रात्री तू स्वप्नांमध्ये
आठवण माझी काढशील
आठवतील ते क्षण सारे
अन हळूच तू गालातल्या गालात हसशील
समजतील जेव्हा तुला
माझ्या अस्वस्थ हद्याची अवस्था
कोमेजून जाशील तू
मग-मात्र एकटी एकांतात रडशील तू
एवढ सारं घडून गेल्यावर
आठवतील तूला माझ्या प्रेमाचे क्षण
तीव्र प्रतिसाद उमटेल तुझ्या काळजावर
अन तूही एक दिवस माझ्या प्रेमात गुंफत जाशील
अजूनही आस आहे
तू माझी खास आहे

