प्रेम तिचं संघर्ष माझा...
प्रेम तिचं संघर्ष माझा...
पाहिले न मी तुला कधी
आठवेना मजला काही
स्मृतिभ्रंश झाला माझा
तुझ्या त्या प्रफुल्लित चेहर्याने
कधी फुटला हर्ष मुखास
मज काही उमललेच नाही
जेव्हा-जेव्हा तुझी आठवण होते मला
तेव्हा-तेव्हा काढतो तुझ्या सौंदर्याची प्रतिकृती
तुझ्या त्या सौंदर्याने
भारावून गेलो मी
तुझ्या त्या हसण्याने
हसतमुख राहिलो मी
तुझी ती गालावरील खळी
मज करते तुझ्या जवळी
का कुणास ठावूक?
अशी आहेस तरी तू कशी
जणू फुलांच्या मळ्यातील
रातराणीच तू
झोपतो जेव्हा तूझ्या आठवणीत
निद्रानाश होतो माझ्या झोपेचा
का कुणास ठाऊक
का करतो मी तूझ्या सौंदर्याचा अभ्यास
तुला मिळवणे हाच आहे का,
फक्त माझा ध्यास

